आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश:पाच हजार‎ 794 मुलांचे अर्ज दाखल‎ ; 17 मार्चपर्यंत मुदत, शिक्षण विभागाचे आवाहन‎

अमरावती‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या‎ शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे‎ जिल्ह्यातील कायम‎ विनाअनुदानित, विनाअनुदानित व‎ स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये‎ २०२३ -२४ या शैक्षणिक‎ वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५‎ टक्के कोट्यातील प्रवेशाची‎ नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.‎ जिल्ह्यातील २३६ शाळांमध्ये २‎ हजार ३०५ जागा आहेत. १७‎ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली‎ असून, जिल्ह्यात आजवर ५‎ हजार ७९४ बालकांचे अर्ज प्राप्त‎ झाले आहेत.‎

जिल्ह्यात १० फेब्रुवारीलाच‎ आरटीईकरिता २३६ शाळांची‎ नोंदणी प्रक्रिया आटोपली. तसेच‎ रिक्त जागांचा आकडादेखील‎ शिक्षण विभागाकडून आधीच‎ जाहीर केली आहे. जिल्ह्यात‎ आरटीईअंतर्गत २३६ शाळांमध्ये २‎ हजार ३०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश केले‎ जाणार आहे.‎ प्रवेश प्रक्रियेचे वेळा पत्रक‎ धडकले. त्यानुसार पालकांना १‎ मार्चपासून प्रवेश अर्ज प्रक्रियेला‎ सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज‎ करण्याची १७ मार्च तारीख देण्यात‎ आली आहे. सदर अर्ज‎ पडताळणी नंतर ते पात्र ठरणार‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...