आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने नव्या रेल्वे रॅकला मंजुरी दिली आहे. खा. नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे रेल्वे रॅकची मागणी केली होती. त्या अनुषंगाने चांदूर बाजार येथे नवी रेल्वे रॅक मंजूर करण्यात आली आहे.
बडनेरा व धामणगांव रेल्वे येथे दोन टेक पॉईंट उपलब्ध आहेत. परंतु, येथून धारणी आणि वरुड तालुक्याचे अंतर फारच जास्त असल्याने खताचा पुरवठा करणे खर्चिक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही खतासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. वाहतुकीसालाही ते परवडत नव्हते. नेमकी ही समस्या लक्षात घेऊन खा. राणा यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला होता. त्या अनुषंगाने देशात १३ रॅक मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी एक रॅक ही चांदूर बाजार येथे देण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अमरावतीला भेट दिल्यानंतर यासंदर्भात अहवाल तयार करून रेल्वे मंत्रालयाला सादर केला होता.
आता रासायनिक खतं थेट कंपनीतून चांदूर बाजार येथे पोहोचतील. तेथून धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी पेथे खत पोहोचविणे सुलभ जाईल. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.