आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:बडनेऱ्यात दोन गटात वाद,‎ एकमेकांच्या दिशेने दगडफेक‎

अमरावती‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरातील जुनी वस्ती परिसरात गांजा‎ पिणाऱ्या तिघांना हटकल्याच्या‎ कारणामुळे दोन गटांत शनिवारी (दि.‎ ४) रात्री वाद झाला. यावेळी दोन्ही गट‎ एकमेकांसमोर आले होते, त्यावेळी‎ दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर‎ दगडफेक सुद्धा करण्यात आली.‎ दरम्यान, या प्रकाराची पोलिसांना‎ माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ‎ घटनास्थळ गाठले आणि परिस्थितीवर‎ नियंत्रण मिळवले.

या प्रकरणात‎ पोलिसांनी दोन्ही गटांतील २५‎ जणांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारींवरुन‎ गुन्हे दाखल केले आहेत.‎ सिंधी कॅम्प परिसरात एका‎ समुदयातील काही युवक गांजा पित‎ असल्याचा आरोप एका गटाकडून‎ करण्यात आला आहे. गांजा‎ पिणाऱ्यांमुळे महिलांची कुचंबणा होत‎ होती. ही बाब लक्षात घेता काही‎ नागरिकांनी त्या तरुणांना हटकले.‎ त्यानंतर दोन्ही समुदायातील नागरिक‎ समोरासमोर आले आणि वाद‎ उफाळून आला. या घटनेनंतर‎ पोलिसांनी पोहोचला. त्यांनी परिसरात‎ तगडा बंदोबस्त लावला होता.‎

बातम्या आणखी आहेत...