आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलजमाई:कुस्ती स्पर्धेदरम्यान आधी सिनिअर कुस्तीपटूंत वाद; नंतर दिलजमाई

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियमवर सध्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान अकोला व अमरावती येथील वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद व सौम्य हाथापाई झाली. परंतु, लगेच राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व एचव्हीपीएम कुस्ती विभागाचे प्रमुख डाॅ. संजय तीर्थंकर यांनी मध्यस्थी करून सिनिअर खेळाडूंमध्ये दिलजमाई घडवून आणली. त्यानंतर वातावरण निवळले व स्पर्धा व्यवस्थित सुरू राहिली. त्यात कोणताही अडथळा आला नाही.

नुकतीच अकोला येथे कुस्त्यांचा दंगल झाली. या दंगलींदरम्यान अमरावतीच्या एका किशोरवयीन कुस्तीपटूंचा मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारा अकोल्यात सिनिअर पहिलवान शालेय खेळाडू घेऊन विभागीय स्पर्धेसाठी आल्याचे अमरावतीच्या सिनिअर खेळाडूंना कळले. तेही स्टेडियममध्ये आले. त्यानंतर अकोला व अमरावतीच्या सिनिअर खेळाडूंमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तुरळक जाचापायी झाली. परंतु, तत्काळ हा वाद सोडवण्यात आला. हे स्पर्धेत सहभागी प्रत्यक्ष खेळाडू नव्हते तर प्रेक्षक म्हणून उपस्थित होते, अशी माहिती योजनांद्वारे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...