आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेची तयारी पूर्ण‎:जिल्ह्यात दहावी, बारावीचे सुमारे‎ तीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी‎ आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर‎ झाल्या असून, विभागीय मंडळाने परीक्षेची‎ बहुतांश तयारी पूर्ण केली आहे.‎ कोरोनानंतर दोन वर्षानी विद्यार्थ्यांची परीक्षा‎ ही शिक्षण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या‎ अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या‎ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. जिल्ह्यात‎ बारावीचे १ लाख ३९ हजार ३४५ विद्यार्थी‎ तर दहावीचे १ लाख ५८ हजार २९१‎ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. दहावीचे‎ जिल्ह्यात ७१६ केंद्र आहेत.

तसेच‎ बारावीची ५२३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा‎ देणार आहे.‎ यंदा पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा‎ राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत‎ विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. त्यासाठी‎ विद्यार्थ्यांनाही जोमाने तयारी करण्याचा‎ सल्ला शिक्षक व पालकांकडून दिला जात‎ आहे. विभागीय शिक्षण मंडळाने‎ परीक्षेसाठी केंद्र निश्चित केली असून,‎ बहुतांश केंद्रांमध्ये उत्तरपत्रिकांचे वितरणही‎ केले आहे. कोरोनाकाळात पहिल्या वर्षी‎ विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नाही. अंतर्गत‎ मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण‎ करण्यात आले. गतवर्षी गृह महाविद्यालय‎ परीक्षा केंद्र देण्यात आले. परीक्षेसाठी ७५‎ टक्के अभ्यासक्रम देण्यात आला. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परीक्षेची भीती नव्हती.

याचा परिणाम‎ विद्यार्थ्यांच्या निकालावरही दिसून आला.‎ त्यामुळे २ वर्षानंतर विद्यार्थ्यांना या पूर्वीच्या‎ परीक्षाप्रमाणे सामोरे जावे लागणार आहे.‎ जिल्ह्यात बारावीचे १ लाख ३९ हजार ३४५,‎ तर दहावीचे १ लाख ५८ हजार २९१‎ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे‎ जिल्ह्यात ७१६ केंद्र आहेत. तसेच‎ बारावीची ५२३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा‎ देणार आहे. कधी नव्हे ते दहावी‎ बारावीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ९०‎ टक्क्यांच्या वर होती. त्यामुळे परीक्षा‎ पद्धतीवर आक्षेप घेण्यात आला होता.‎ मात्र, यंदाच्या शिक्षण मंडळाकडून‎ विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या केंद्रावर‎ जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. या‎ वर्षीची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर‎ होणार आहे. त्यामुळे यंदाची परीक्षा‎ विद्यार्थ्यांसाठी कसोटी ठरणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...