आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या बाप्पांचे विसर्जन:श्रींच्या विसर्जनासाठी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीला (दि.९) दहा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभुमीवर महानगर पालिकेद्वारे लाडक्या बाप्पांचे विसर्जन पर्यावरणपूरक व निर्विघ्न व्हावे, यासाठी शहराच्या पाचही झोनमध्ये २१ कृत्रिम टाक्यांची (टँक) सोय करण्यात आली आहे.

श्रींच्या विसर्जनासाठी अभियंता भवन, शेगाव नाका, सहकार नगर मैदान, फार्मसी शासकीय विद्यालय, कठोरा नाका, शिवाजी कमर्शियल मार्केट, रवीनगर चौक, नेहरू मैदान, प्रशांत नगर उद्यान, मालटेकडी जवळ, वडाळी, विद्यापीठ चौकातील पुलाजवळ, छत्री तलाव, मोती नगर उद्यान, साईनगर, साईमंदिराजवळ, बडनेरा झिरी तलाव, गोपालनगर जीमजवळ, बडनेरा येथील बारीपुरा, रवी नगर, हनुमान नगर, बुधवारा या २१ ठिकाणी मनपाद्वारे कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली.

स्वच्छता, निर्माल्याच्या नियोजनावरही लक्ष
विसर्जन कृत्रिम टाक्याजवळ स्वच्छता राहील यासोबतच निर्माल्याचे वेगळे नियोजन करण्याची व्यवस्था नियंत्रण अधिकाऱ्यांना करायची आहे. सोबतच नागरिकांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझरची फवारणी, दैनंदिन फवारणी, धुवारणी, लिन्ड्रेन व चुना पावडर फवारणी करून घेतली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...