आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:संत्रा चोरांना तत्काळ अटक करा; भाजपची मागणी, ठाणेदारांना निवेदन

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत्रा नगरीत मोठ्या प्रमाणात संत्रा चोरांचा सुळसुळाट वाढला वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. रात्रीतून शेतकऱ्यांच्या बागेतून संत्र्याची चोरी होत असल्याने उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याची दखल घेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी ठाणेदार सतीश इंगळे यांची भेट घेत चर्चा करीत निवेदन दिले.

संत्रा चोरट्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदन देते वेळी भाजप शहराध्यक्ष नीलेश फुटाणे, विशाल सावरकर, नीलेश वसुले, पवन मोघे, उमेश हजारे, स्वप्निल बोबडे, प्रज्ज्वल खसारे, सुनील होले, बंडू काळे, शैलेश विटाळकर, नितीन गोरडे, मयुर खेरडे, दिनेश फुटाणे, किरण शेवतकर, राजू गोरडे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...