आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचैतन्य कॉलनी येथून मालवाहू वाहन चोरणाऱ्या एका चोरट्यास घटनेनंतर अवघ्या पाच तासांतच फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगर चौकात नाकाबंदी करून अटक केली. चोरट्याकडून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. महादेवखोरी येथील रहिवासी संजय गणेश जोध (४५) हे मालवाहू वाहन चालवितात. चैतन्य कॉलनी परिसरात दररोज संजय जोध हे आपले मालवाहू वाहन उभे करतात. रविवारी (दि. ३) रात्रीसुद्धा त्यांनी मालवाहू वाहन चैतन्य कॉलनीतील दुकानासमोर उभे केले होते. रात्रीच्या वेळी चोरट्याने सदर वाहन लांबविले. याबाबत परिसरातील रहिवासी अमोल वानखडे यांनी संजय जोध यांना मोबाइलवर कॉल करून माहिती दिली. त्यानंतर संजय जोध यांनी तातडीने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. यशोदानगर चौकात नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहन चोरटा रोशन पामाजी वानखेडे (२८) रा. उत्तमनगर यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले. सदरची कारवाई ठाणेदार अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सुनील सोळंके, महेंद्र वलके, वचन पंडीत आदिंनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.