आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिका प्रशासनाचा ‘चंद्रभागा आपल्या दारी’ उपक्रम:गाडगेबाबा मंडळाचा कृत्रिम तलाव विसर्जनासाठी सज्ज; मिरवणुकांवर राहणार कॅमेऱ्यांचा वॉच

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाचे स्वागत अगदी जल्लोषात करण्यात आले. मात्र, आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. तसेच सार्वजनिक गणपतींसह अनेक घरगुती गणपतींची नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी होवू नये, यासाठी होणारे जलप्रदूषण व मुर्तींची कुठलीही विटंबना होवू नये, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला आहे.

जलवृक्ष चळवळ, गाडगेबाबा महिला मंडळ व महसूल प्रशासनाच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे, तसेच माहुली धांडे मार्गावरील गाडगेबाबा गोरक्षणावर गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी दिली.

भक्तांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

शहरातील ठिकठिकाणच्या विसर्जन मार्गावर तसेच चंद्रभागा नदीपात्र, बाभळीचा पुल, टाकळी नदी या ठिकाणी पालिका प्रशासनाने पुरेशी प्रकाश व्यवस्था, रस्ते स्वच्छता, नदीपात्रात दुर्घटना टाळण्यासाठी पोहणाऱ्यांची चमू, बॅरीकेटस व अन्य सेवा पुरविण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी नंदू परळकर, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राहुल देशमुख यांनी दिली, तसेच चंद्रभागा आपल्या दारी मोहिमेंतर्गत सजविलेले ट्रॅक्टर, निर्माल्य रथ शहरभर फिरणार आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणपुरक गणेश विसर्जनासाठी गाडगेबाबा मंडळाच्या कृत्रिम तलावाचे हे सलग पाचवे वर्ष असून गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जन व गणेशभक्तांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे तहसीलदार डॉ.योगेश देशमुख यांनी सांगितले.

पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर गणेशोत्सव धामधुमीत साजरा होत असल्याने या वर्षी विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दी व मिरवणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह 5 अधिकारी, 52 पोलिस अमंलदार, मुख्यालयातील 15 पोलिस, 25 होमगार्ड, दंगा नियत्रण पथक व नागपूर पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात राहणार असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...