आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचे गूढ कायम:अश्विनीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी ; प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अर्जुननगर परिसरातील रत्नप्रभा कॉलनीत राहणाऱ्या २८ वर्षीय अभियंता अश्विनी खांडेकर या तरुणीचा मृतदेह ३ डिसेंबरला घराच्या वर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळला होता. दरम्यान, वैद्यकिय तज्ज्ञांनी शनिवारीच (दि. ३) मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन केले. रविवारी (दि. ४) पोलिसांना डॉक्टरांकडून प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार अश्विनीचा मृत्यू शवविच्छेदनाच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला आहे. मात्र, मृत्यूबाबतच्या इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मृतदेह कुजल्यामुळे प्राथमिक अहवालात नमूद नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अश्विनीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हा महत्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीय आहे. पोलिसांनी डॉक्टरांना मृत्यूच्या कारणासह अन्य काही प्रश्न शवविच्छेदनाअंती विचारले आहेत, मात्र मृतदेह कुजल्यामुळे त्याची उत्तरे डॉक्टरांकडून पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे आता पोलिसांना व्हिसेरा तपासणीअंतीच उर्वरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आणि मृत्यूचे गूढ उकलण्यात मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...