आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारसमृद्धीसाठी तरुणांनी वाचनाकडे वळावे:उपायुक्त संजय पवारांचे प्रतिपादन; विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाचनातून आकलनशक्ती वाढून विचारांना स्थैर्य मिळते. त्यामुळे केवळ स्मार्ट फोनवर वेळ न घालवता पुस्तकांचे वाचनही तरुण पिढीने नियमितपणे करावे, असे प्रतिपादन विभागीय उपायुक्त संजय पवार यांनी गुरुवार 3 नोव्हेंबरला रोजी विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी केले.

उद्या शेवटचा दिवस

सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी यावेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबर संध्याकाळी. 6.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

स्मार्ट फोन युगात वाचनाची आवड टिकून राहणे आवश्यक

ग्रंथालयाला भेट देणे हे आपल्यासाठी कायम आनंददायी असल्याचे सांगून उपायुक्त म्हणाले की, वाचनाचा ठेवा माणसाला लहानपणापासून शेवटपर्यंत साथ देतो. पुस्तकांचा परिणाम सकारात्मक असतो. स्मार्ट फोनच्या युगातही वाचनाची परंपरा टिकून राहणे आवश्यक आहे. विचारांची बैठक घडविण्यासाठी वाचन आवश्यक असते.

काय म्हणाले म्हस्के?

सहायक आयुक्त म्हस्के म्हणाले स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकांसारखी अभ्यास साधने उपयुक्त असतात. विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्याने त्यांच्या जीवन संघर्षाचे, कार्याचे आकलन होते व प्रेरणा मिळते. संवेदनशील मन घडविण्याची ताकद पुस्तकांत असते.

200 दिवाळी अंकांचा समावेश

प्रदर्शनात राज्यातील महत्वाच्या 200 दिवाळी अंकांचा समावेश असल्याचे मडावी यांनी सांगितले. प्रदर्शनाला अमरावतीकर रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ढोणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...