आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेतीची तस्करी करणाऱ्याला प्रतिबंध केला म्हणून संबंधिताने थेट सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर दगड उगारून मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जावरा ते वाघोली रस्त्यावर घडला असून, पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅक्टर मालकासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिवाय घटनेच्या तिसऱ्या दिवशी, मंगळवारी दोन ट्रॅक्टरही जप्त केले.
प्रफुल शिंदे, रा. जावरा असे सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर दगड उगारणाऱ्या रेती तस्कराचे नाव आहे. सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे वनक्षेत्र असलेल्या वाघोली ते जावरा भागातून रेती तस्करीची वाहतूक होत होती. त्यास अनुसरून त्यांना ८ मे रोजी रात्री दीडच्या सुमारास त्यांना दोन ट्रॅक्टर रेती घेऊन जात असताना दिसले. त्यांना विचारले असता ट्रॅक्टर चालकाकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.
हा ट्रॅक्टर कार्यालयात नेण्यास सांगताच तेथे ट्रक्टरमालक प्रफुल्ल शिंदे आला आणि त्याने सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन राऊत यांना धक्का देत त्यांच्यावर दगड उगारला. शिवाय चालकाकडील मोबाइल हिसकावून दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबतची तक्रार नितीन राऊत यांनी तिवसा पोलिसांत दाखल केली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी प्रफुल्ल शिंदे यासह अन्य तिघांविरुद्ध भादंवि कलम ३७९,१८६ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. मंगळवारी दोन्ही ट्रॅक्टर तिवसा पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.