आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:अखेर शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला; 9 जूनपासून सुरु होणार पोर्टल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती; शिक्षक संघटनांशी चर्चा

गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला आहे. या बदल्यांसाठीचे पोर्टल आगामी ९ जूनपासून सुरु होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. शिक्षक वगळता जिल्हा परिषदेतील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या ३१ मे रोजीच पूर्ण झाली. त्यामुळे काही संघटनांनी जिल्हा परिषदेसमोरउपोषण करुन हा मुद्दा धसास लावला होता.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक क्रांती सेना व इतर संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी मुश्रीफ यांनी वरील माहिती पुरविली. मोर्शी-वरुडचे आ. देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनीच शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. यावेळी अविनाश पुसदेकर, श्याम खुंटे, सुनील मातकर, सुनील जाणे आदी प्रतिनिधी त्यांच्यासोबत होते. चर्चेअंती मंत्री महोदय हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांना तयारीला लागण्याची सूचना केली. त्यांच्यामते ९ जून रोजी बदल्यांचे ऑनलाइन पोर्टल सुरु होईल. त्यानुसार शिक्षकांनी माहिती भरावी. ती अपडेट होत बदली पर्यंत पोहोचेल. मुश्रीफ यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की, २७ मे रोजीच्या शासन निर्णयाशी शिक्षक बदलीचा काहीही सबंध नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पोर्टल सुरु होऊन शिक्षकांच्या बदल्या होतील. काही दिवसांत शाळा सुरु होणार असल्याचा मुद्दाही मंतंच्या लक्षात आणून देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...