आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकोंडी:त्याच ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटली; शहरवासीयांची पुन्हा जलकोंडी

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रहाटगावजवळ ‘त्या’च ठिकाणी १५०० मि.मी.व्यासाठी मुख्य जलवाहिनी शुक्रवार १० रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास फुटल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यास दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याने ११ व १२ रोजी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असे मजीप्राच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामुळे १० रोजी सायंकाळीही शहरातील अर्ध्या भागाला पाणीपुरवठा झाला नाही.

शहरात सकाळी व सायंकाळी तसेच एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी दुपारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी टाक्यांमध्ये पोहोचलेच नाही. त्यामुळे सायंकाळी पाणी पुरवठा झाला नसल्याची माहिती मजीप्राद्वारे देण्यात आली. अर्थात यावेळीही शहरवासीयांना तीन दिवस जलकोंडी सहन करावी लागण्याची शक्यता आहे. पीएससी नेरपिंगळाई ते जल शुद्धीकरण केंद्र, तपोवन, अमरावतीपर्यंत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे रहाटगावजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, परिसरातील गडरही ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना १३ रोजीच पाणी मिळण्याची शक्यता आहे.

स्टील जलवाहिनीचा प्रस्ताव धुळखात
‘मजीप्रा’कडे मनुष्यबळाची उणीव आहे. अशात वारंवार पाणी गळतीच्या घटना घडतात. त्याला आळा बसावा म्हणून सुमारे ३० वर्षे जुनी सिमेंट काँक्रिटची जलवाहिनी बदलण्याचा निर्णय झाला. यासाठी शासनाकडे सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रस्तावही पाठवण्यात आला. परंतु, तो तसाच धूळखात पडल्यामुळे शहरवासीयांवर वारंवार पाण्याविना राहावे लागत आहे. शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाची जन प्रतिनिधींनीही दखल घ्यावी, अशी मागणी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...