आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन:राजकमल चौकात खेळाडूंनी प्रतिकात्मक सरावासह केला केंद्र सरकारचा निषेध

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या धोरणामुळे बंद झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याचं पाहिजे. या मागणीला घेऊन शनिवारी राजकमल चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. एज्युकेशन इज मस्ट- बट हेल्थ इज फर्स्ट असा संदेश देत या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी केंद्र शासनाच्या क्रीडा धोरणाचे उदासीन भूमिकेचा निषेध फलक उंचावीत व घोषणाबाजी करीत निषेध केला. तसेच प्रतिकात्मक क्रीडा स्पर्धेचे फुटपाथवर आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यानी क्रीडा स्पर्धा गणवेश घालून व क्रीडा साहित्य सोबत आणून सहभाग नोंदवला.

हे अनोखे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील शारीरिक शिक्षक अजय आळशी, शिवदत्त ढवळे, डाॅ‌. नितीन चवाळे, श्रीकृष्ण ठाकरे (धामोरी ), संदीप इंगोले, अनिल विल्हेकर, दिलीप नवरे (दर्यापूर ), संजय मालवीय, विजय मानकर ,आकाश भोयर, संतोष मिसाळ, विश्वास जाधव, संतोष अरोरा, संदेश गिरी, महेश अलोने, संजय सवाई (मोर्शी ), प्रदीप ठाकरे, संगीता येवतीकर (आसरा), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर अॅड. किशोर शेळके, माजी नगरसेवक रतन डेंडूले, भुषण बनसोड, लकी नंदा, जितेंद्र ठाकूर, अशोक हजारे, सुनील रायटे, पप्पू खत्री, प्रमोद सांगोले, मनोज केवले, किशोर भुयार, वासुदेव वानखडे व इतर उपस्थित हो उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...