आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मैत्रिणीकडे खेळायला गेलेल्या बालिकेवर युवकाकडून अत्याचार

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रिणीकडे खेळायला गेलेल्या बालिकेला घरात बोलावून १९ वर्षीय युवकाने तिच्यावर अत्याचा केला. ही बाब ऐवढ्यावरच थांबली नाही, तर सलग दोन ते तीन दिवस त्याने तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर, तुला विषारी द्रव्य देवून मीही आत्महत्या करेन अशी धमकी युवकाने बालिकेला दिली. मात्र, ही बाब तिने तिच्या पालकांना सांगीतली. ही घटना कुऱ्हा पोलिस क्षेत्रात १९ रोजी घडली.

ही बाब कळताच चिमुकलीच्या पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. दरम्यान, मुलीच्या जीवाला त्यामुळे धोका असल्याने त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, अखेर बुधवारी (दि. २२) रात्री उशीरा त्यांनी कुऱ्हा पोलिस ठाणे गाठून युवकाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अत्याचार करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून. पुढील तपास कुऱ्हा पोलिस करीत आहेत. दरम्यान, अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराचे प्रकार अलीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.