आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲट्रॉसिटी:भातकुली सीओ, नगराध्यक्षांसह 9 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य, नगराध्यक्षांसह नऊ जणांविरुध्द नगरसेवक सतीश आठवले यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, तर मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून नगरसेवक आठवलेंसह दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आला. शुक्रवारी (दि. २९) रात्री परस्पर तक्रारीवरून हे दोन्ही गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भातकुली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होती. त्यात एका प्रस्तावावरून मोठी खडाजंगी झाली. नगरसेवक व प्रशासन समोरासमोर आले. सभागृहातून नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी हे मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले. या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर भातकुलीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी नगरसेवक सतीश आठवले आणि श्रीकांत बालकिशन राठी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक आठवले व राठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

त्यानंतर नगरसेवक सतीश आठवले यांनी भातकुलीच्या मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवक पुरूषोत्तम सदाशिवराव खर्चान, नगरसेवक शंकर सदाशिव डोंगरे, नगरसेवक सुनिल हरिभाऊ भोपसे, नगरसेवक गिरीष रामकिसन कासट, नगरसवेक संजय सोळंके, नगरपालिका अधिक्षक मयूर बेहरे आणि कर्मचारी संतोष केतकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या नऊ जणांनी आपल्याला जातिवाचक शिवीगाळ केली, जीवे मारण्याच्या धमकी दिली, असा उल्लेख तक्रारीत नगरसेवक सतीश आठवले यांनी केला. या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...