आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:पोळ्यातून बैल घेऊन जाणाऱ्या युवकावर हल्ला ; विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोळ्यातून बैल घरी घेऊन जात असलेल्या युवकाला अडवून वाद घालत प्राणघातक हल्ला केल्याची घटना २६ ऑगस्टला रात्री ९ वाजताच्या सुमारास कवडीपूर ग्रामपंचायत परिसरात घडली. या प्रकरणी शनिवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. संदिप कदम (२५) रा. ओम नगर असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. तर धम्मपाल हापसे हा गंभीर जखमी असून सुमित घड्याळे हा किरकोळ जखमी झाला आहे.

या प्रकरणी शेख नईम शेख मदार (२२) रा. मुलतानवाडी यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनूसार, शेख नईम हा त्याच्या वडिलांसोबत रात्री ९ वाजता कवडीपूर ग्रा. पं. हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळून पोळ्याचे बैल घेऊन घरी जात होता. यावेळी त्याच मार्गाने संदीप हा त्याच्या दुचाकीवरून एका महिलेला घेऊन जात होता. यावेळी संदीप याने शेख नईम सोबत वाद निर्माण केला.

बातम्या आणखी आहेत...