आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांची पाहणी:नर्सरी ते पहिली इंग्रजीतून सुरू करण्यासाठी प्रयत्न; आ. सुलभा खोडके यांनी केली मनपाच्या दहा शाळांची पाहणी

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या, सुविधा चांगल्या असूनही विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. भविष्यात या शाळा टिकल्या पाहिजे व सर्वसामान्य गरीब व गरजू घटकांना प्रगत शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मनपाच्या शाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

यासाठी शैक्षणिक सत्रापासूनच मनपाच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी-वन, केजी-टू व पहिलीचा वर्ग इंग्रजीतून सुरु करण्याचा मानस आ. सुलभा खोडके यांनी व्यक्त केला. शनिवारी त्यांनी मनपा शाळांची पाहणी केली.

जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सत्राचे नियोजन हे आतापासूनच करुन मनपा शाळांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत आ. खोडके यांनी गेल्या ३० एप्रिल रोजी महापालिकेत शिक्षण विभागाची बैठक घेतली होती. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढल्याने मनपा शाळांतील पटसंख्या कमी झाल्याचे यावेळी समोर आल्याने इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याबाबत आ. खोडके यांनी प्रस्तावित केले.

बातम्या आणखी आहेत...