आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाकरिता आलेले उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांदे व कापूस फेकण्याचा प्रयत्न केला असता आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांनी कृषी महोत्सव सुरू असलेल्या सायन्सकोर मैदाना समोर पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी अमरावती दौरा होता.
त्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून कार्यक्रम संपल्यावर सायन्सकोर मैदान येथील कृषी महोत्सवाकडे वळला. दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा सायन्सकोर येथे पोहोचताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी खिश्यात भरून आणलेले कांदे व कापूस रस्त्यावर फेकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी त्यांच्या जवळून काळे झेंडेदेखील जप्त करण्यात आले. कापूस व सोयाबिनला भाव मिळावा, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे तसेच अतिवृष्टीची मदत द्यावी या मागण्यांसह बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कपिल पडघान, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, अनिल पवार, सतीश शेळके, अरिहंत देशमुख, अनिकेत बनसोड यांना ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.