आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिप्रसंग:12 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलिस स्टेशन अंतर्गत एका १२ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिलिंद उर्फ बबलू हरणे (४४) याला ताब्यात घेतले. रविवार, १८ डिसेंबर राेजी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेच्या वेळी चिमुकली तिच्या आजीसोबत शेंगा तोडण्यासाठी शेतात गेली होती. त्या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला युवक तेथे आला. त्याने तिला बोर व मध देण्याचे आमिष देत दुसऱ्या शेताच्या धुऱ्यावर नेले. दरम्यान काही वेळाने चिमुकलीचा जोराने आवाज आल्याने आजीने तेथे धाव घेत तिला विचारणा केली. त्या वेळी तिने घडलेला प्रकार आजीला सांगितला. याबाबत आजीने रहिमापूर चिंचोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करून युवकाला ताब्यात घेतले.

घटनेचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे, एपीआय सचिन पाटील, पोलिस कर्मचारी गजानन वर्मा, उमेश नागदिवे, चंद्रकांत खंडार, आदित्यनाथ खाडे, संदीप वाघ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...