आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार सुरू:तरुण-तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने तसेच १९ वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोघांवरही गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी (दि. ३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास आधी तरुणाला व काही वेळातच मुलीला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल केले आहे. दोघांवरही उपचार सुरू आहेत. त्यांनी कोणते विष घेतले किंवा त्या दोघांचा एकमेकांसोबत काही संबंध आहे किंवा नाही, याबाबत वृत्त लिहीस्तोवर माहिती स्पष्ट झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...