आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्ड प्रकरणी कोणतेही तथ्य नसताना केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून काँग्रेस नेत्यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात इर्विन चौक येथे धरणे दिले. त्यासोबतच केंद्र शासनाच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करीत युवक काँग्रेसच्या वतीने ‘ईडी’चा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी तो आधीच हिसकावला. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्र जगताप, आ. बळवंत वानखडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे उपस्थित होते. तसेच शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरी मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने केलीत. देशात वाढलेली सुशिक्षित बेरोजगारांची बेकारी, गरीबी, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडून मोदी सरकार फक्त ‘ईडी’चा दुरुपयोग करून जनतेचे लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता ‘ईडी’चा वार त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावरही सुरू केला आहे. त्यांच्यासह काँग्रेसच्या इतरही नेत्यांना विनाकारण मोदी सरकार त्रास देत असल्याचा आरोप करीत केंद्र शासनाच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, आ. बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते इर्विन चौक येथे धडकले होते. यावेळी केंद्र शासनाविरोधात निदर्शने करीत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. दरम्यान, युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी ‘ईडी’चा पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पुतळा जाळण्यापूर्वीच त्यांच्याकडून हिसकावला. काँग्रेस नेत्यांवरील या कारवाया त्वरित बंद कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले. या आंदोलनात नरेश चंद्र ठाकरे, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे , हरिभाऊ मोहड,संजय वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सुनील गावंडे, प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख, प्रवीण मनोहरे, भैय्या साहेब मेटकर, संजय बेलोकार, संजय लायदे, संजय मापले, प्रदीप देशमुख, श्रीकांत गावंडे, शिवाजी बंड, सतीश हाडोळे, दीपक सवाई, एजाज खान, राहुल गाठे, नामदेव तनपुरे, अभिजित देवके, श्रीधर काळे, अर्चना सवाई, किशोर देशमुख, राहूल येवले, पंकज मोरे, सिद्धार्थ बोबडे, बबलू बोबडे आदींचा सहभाग होता. ‘ईडी’च्या दडपशाही विरोधात शहर काँग्रेसची निदर्शने केंद्र सरकार व ‘ईडी’च्या दडपशाही विरोधात शहर काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर निदर्शने केलीत. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांना ‘ईडी’कडून चौकशी साठी बोलावले. त्यानंतर त्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष कोणत्याही चौकशीला घाबरणार नसल्याचे काँग्रेस पक्षांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील देशमुख, शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत,माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, डॉ.दिनेश गवळी, अशोकराव डोंगरे, बाळासाहेब भुयार, कोमल बोथरा, संजय वाघ, संजय अकर्ते, विनोद मोदी, सुजाता झाडे,भैय्यासाहेब निचळ, प्रभा आवारे, अनिल माधोगढीया, सलीम बेग, विजय वानखडे, गोपाल धर्माळे, सुनील जावरे, प्रदीप हिवसे, गजानन जाधव, श्याम देशमुख, नीलेश गुहे, अनिकेत ढेंगले, वैभव देशमूख, संकेत कुलट, अंकुश डाहाके, वंदना थोरात, अनिला काझी, प्रा.अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी, विजय आठवले, महेश राठी,अस्मा परवीन, सुरेश रतावा, मुकेश गिरी, आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.