आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मागण्यांसाठी‎ ऑटोचालक एकवटले‎:ऑटोचालकाच्या सभेला पोलिस आयुक्तांची उपस्थिती‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ऑटो चालकांच्या विविध‎ समस्या तसेच त्यांच्यावर होणाऱ्या‎ अन्यायाविरोधात आवाज‎ उठवण्यासाठी रविवारी जिल्हा ऑटो‎ युनियनची जाहीर सभा नेहरू मैदान‎ टाऊन हॉल परिसरात पार पडली. या‎ सभेत शहरातील ऑटोचालक‎ मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने‎ जवळपास दोन तास शहरातील‎ ऑटोची वाहतूक बंद होती. या‎ सभेला संबोधित करताना पोलिस‎ आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी‎ ऑटोचालकांना कायद्याचे पालन‎ करण्याचे आवाहन केले.

सोबतच‎ विनाकारण कोणताही पोलिस‎ कर्मचारी ऑटो चालकांना त्रास देत‎ असेल तर त्याची माहिती दिल्यास‎ संबंधित ऑटो चालकावर अन्याय‎ होऊ देणार नसल्याचे आश्वासनही‎ रेड्डी यांनी या वेळी दिले.‎ शहरात ४ हजारांच्या वर अधिकृत‎ ऑटो चालक आहेत. या ऑटो‎ चालकांना अनेक अडचणींना सामना‎ करावा लागत आहे. शहरातील अवैध‎ चालणारी सिटी बस बंद करावी,‎ ऑटोचालकांना २०० रुपये इन्शुरन्स‎ देण्यात यावा. शहरात ऑटो आणि‎ चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने‎ बस, रिक्षा स्टँड परिसरात अतिक्रमण‎ वाढले आहेत.

त्यामुळे ऑटो स्टँडची‎ संख्या ५५ वरून १०० वर करावी.‎ सोबतच अतिक्रमण करणाऱ्या‎ वाहनांवर कारवाई करावी. , या सर्व‎ प्रश्नांवर जिल्हा ऑटो युनियनची‎ सभा पार पडली. या सभेला‎ मार्गदर्शक म्हणून पोलिस आयुक्त‎ नवीनचंद्र रेड्डी, राष्ट्रवादीचे नेते संजय‎ खोडके, वाहतूक पोलिस निरीक्षक‎ राहुल आठवले, विदर्भ ऑटो युनियन‎ अध्यक्ष नितीन मोहोड, तसेच महिला‎ ऑटोचालक सुप्रिया गजभिये विचार‎ मंचावर उपस्थित होते.‎