आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांशी संवाद:स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या‎ गुणात्मक विकासाकडे लक्ष‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे‎ जागतिक पातळीवरचे विद्यापीठ आहे.‎ त्यामुळे या विद्यापीठाचे नाव लौकीक‎ कायम राखण्याचा आपला प्रयत्न‎ राहणार आहे. यासाठी कर्मचारी व‎ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण काम‎ करणार आहोत. यासोबतच स्पर्धात्मक‎ युगात विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास‎ होईल, याकडे लक्ष देणार असल्याची‎ ग्वाही संत गाडगेबाबा अमरावती‎ विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद‎ येवले यांनी आज शनिवारी दुपारी‎ पत्रकारांशी संवाद साधताना दिली.‎

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.‎ दिलीप मालखेडे यांचे निधन‎ झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा‎ प्रभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरू डॉ.‎ प्रमोद येवले यांनी घेतला. पदभारानंतर‎ आज त्यांनी सिनेट सभागृहात त्यांनी‎ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी‎ त्यांनी सांगितले की, स्व. दिलीप‎ मालखेडे आपले चांगले मित्र होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अमरावती विद्यापीठास वेगळ्या उंचीवर‎ नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

परंतु त्यांचे‎ कार्य अपूर्ण राहीले आहे. आपणाकडे‎ विद्यापीठाची जबाबदारी आली आहे.‎ राज्यपालांनी आपणास ही जबाबदारी‎ दिली आहे. राज्य शासन व विद्यापीठ‎ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार‎ कारभार करणार आहोत. अमरावती‎ विद्यापीठ जागतिक पातळीचे आहे.‎ त्यामुळे विद्यापीठासाठी काम करण्याचे‎ आवाहन आपल्यापुढे आहे. कुलगुरू‎ म्हणुन आपण पाचव्यांदा कामगिरी‎ बजावत आहे.

विद्यापीठीय कर्मचारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संपावर आहेत. राज्य शासन त्यांच्या‎ सोबत चर्चा करीत आहेत. परंतु, परीक्षा‎ काळातील संपामुळे विद्यार्थ्यांचे‎ नुकसान होत असते. तरी देखील‎ विद्यापीठाची यंत्रणा परीक्षा पुढे‎ ढकलण्याच्या पवित्र्यात नाही. परीक्षा‎ वेळेवर होवून निकालही वेळेवर‎ लागणार आहेत. ३० जूनपर्यंत सर्व‎ निकाल लागणार असून त्यानंतर नवीन‎ वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.‎ संपकरी विद्यापीठीय कर्मचाऱ्यांसोबत‎ चर्चा सुरु असल्याचे डॉ. येवले‎ म्हणाले. विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आपण आज सर्व अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.‎

विकासात्मक कार्यप्रणाली‎ राबवण्यासाठी नियोजन करण्यात येणार‎ आहे. औरंगाबाद व अमरावती‎ विद्यापीठाची जबाबदारी‎ सांभाळण्यासाठी आपण प्रयत्न करीत‎ असल्याची ग्वाही डॉ. प्रमोद येवले‎ यांनी दिली. यावेळी पत्र-परिषदेला‎ कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा‎ व मूल्यमापन मंडळाच्या सचिव‎ मोनाली तोटे, जनसंपर्क अधिकारी डॉ.‎ विलास नांदूरकर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...