आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो शिरला दुकानात:बसस्थानक चौकात राँगसाइड जाणारा ऑटो शिरला फळांच्या दुकानामध्ये

अंजनगांव सुर्जी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवीन बसस्थानक चौकातील फळांच्या दुकानात चुकीच्या दिशेने जाणारा प्रवासी ऑटो घुसल्याने दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने फळाच्या दुकानासमोर कुठलेही ग्राहक नसल्याने जीवितहानी टाळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी ऑटोचे चालक प्रवाशी घेण्याच्या नादात सर्व नियम धाब्यावर बसवतात. कधी-कधी प्रवाशांना आपल्या वाहनात बसवण्यासाठी त्यांच्यामागे ऑटो लावतात. या ऑटो चालकानेही चुकीच्या दिशेने ऑटो नेऊन प्रवाशी बसवण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्याचवेळी विरुद्धबाजूने येणाऱ्या दुसऱ्या वाहनांमुळे ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो सरळ मुख्य रस्तालगत असलेल्या फळांच्या दुकानात घुसला. त्यामुळे फळ विक्रेत्याचे प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी प्रवाशी ऑटोवर कारवाई केली होती. तरीही नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या नादात ऑटोचालक अडचण निर्माण करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...