आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ऑटोरिक्षा 30 फूट फरपटत नेली, ऑटोचालकाचा मृत्यू

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका प्रवाशी ऑटोला अज्ञात कारप्रमाणे दिसणाऱ्या वाहनाने (वाहन अद्याप निश्चित नाही) तब्बल ३० ते ३५ फूट फरफटत नेले. या अपघातात २७ वर्षीय ऑटोचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री अमरावती ते नागपूर महामार्गावरील बोरगाव धर्माळे नजीकच्या जुन्या जकात नाक्यावर झाला आहे.

शेख इम्रान शेख चांद खान (२७, रा. प्रविणनगर, अमरावती) असे मृतक ऑटोचालकाचे नाव आहे. शेख इम्रान त्यांचा ऑटो घेऊन बोरगावजवळ असलेल्या ड्रीमलँड मार्केटमधून शहराच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी समाेरून आलेल्या वाहनाने त्यांच्या ऑटोला जबर धडक दिली. या वेळी धडक देणाऱ्या वाहनामध्ये ऑटो अडकला व त्या वाहनाने ऑटो सुमारे ३० ते ३५ फूट फरफटत नेला.

या अपघातात ऑटोचालकाला गंभीर दुखापत झाली व त्याचा मृत्यू झाला. या वेळी ऑटोमध्ये चालकाव्यतिरीक्त अन्य कोणी प्रवासी नव्हते, असे नांदगाव पेठ पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पेठ ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...