आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटलिफ्टींग स्पर्धा:ज्युनिअर नॅशनल वेटलिफ्टींग स्पर्धेत प्रतीक्षा ठरली रौप्यपदकाची मानकरी; क्रीडा प्रबोधिनी पुण्याची खेळाडू प्रतीक्षा राजेश कडूने 76 किलो वजन गटात 172 किलो वजन उचलुन रौप्यपदक पटकावले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर नॅशनल वेटलिफ्टींग स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधिनी पुण्याची खेळाडू प्रतीक्षा राजेश कडूने ७६ किलो वजन गटात १७२ किलो वजन उचलुन रौप्यपदक पटकावले.

प्रतिक्षा क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे उज्ज्वला माने यांच्या मार्गदर्शनात गेल्या पाच वर्षांपासून सराव करीत आहे व इंद्रायणी कॉलेज तळेगाव (दाभाडे) पुणे येथे शिक्षण घेत असून स्थानिक राजा पेठ येथील रहिवासी आहे. भुवनेश्वर येथे २१ ते २८ एप्रिलला झालेल्या फेडरेशन नॅशनलमध्ये १७२ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले आहे.

शहरातील सर्व स्तरातून प्रतीक्षावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व कोच तसेच परिवारातील सर्व सदस्यांना देत आहे. प्रतीक्षाने रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार माजी मनपा गटनेता चेतन पवार यांनी केला. तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब होले, जया अळसपुरे, वर्षा कडू, दीपक इंगळे, राधिका कडू उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...