आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकतेच १३ शहरी आरोग्य केंद्रातील कामाकाजाचा आढावा घेत सर्वोकृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांना हाॅटेल ग्रेस इन, राजापेठ येथे आयोजित आशा पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा कार्यकर्त्या अहोरात्र काम करतात. त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. फिरोज खान तसेच कुष्ठराेग सहसंचालक डॉ. अंकुश सिरसाठ, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. जोगी, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना समन्वयक धर्मेंद्र मंगीकर, महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना समन्वयक डॉ. सुमेधबोधी चाटसे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला मुख्यालयातील आर. सी. एच. अधिकारी डॉ. प्रतिभा आत्राम, कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, शहर लेखा व्यवस्थापक कल्पना दुध्याल, शहरी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व पीएचएन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, एएनएम व उत्कृष्ट काम केलेल्या आशा सेविका व इतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत १३ शहरी आरोग्य केंद्रातील २०२२-२३ मध्ये केलेल्या कामाचा आढावा डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. संदीप पाटबागे, वर्षा गुहे तसेच कल्पना दुध्याल यांनी घेतला. यामध्ये मनपा अमरावती कार्यक्षेत्रात घेण्यात येणारे सर्व लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, आरआय सत्र याबाबत सर्वांशी चर्चा केली व आढावा घेतला.
डॉ. काळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व आशा व एएनएम यांनी आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील आरसीएच अधिकारी डॉ. प्रतिभा आत्राम, कोरोना नोडल अधिकारी डॉ. संदीप पाठबागे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. वर्षा गुहे, कल्पना दुध्याल, आतिश यादव, अभिजित कुऱ्हेकर, रूपम खंडेझोड, विक्रांत सातरकर, रवी बाभुळकर, विनोद इंगोले, तनया गुल्हाने, गोपाल चव्हाण, मनीष कोंबे यांनी सहकार्य केले. या वेळी डॉ. उघडे, डॉ. कोवे, डॉ. राजुरकर, डॉ. जाधव, डॉ. मोटघरे, डॉ. निगार खान, डॉ. अकिब उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट आशा सेविकांना ५ हजाराचा पुरस्कार : १० शहरी आरोग्य केंद्राच्या सर्वोत्कृष्ट आशा सेविका रेशमा रवींद्र भोंगाडे, माया वानखडे, रंजना उपरीकर, नंदा बिलबिले, संगीता वानखडे, फरहिन कौसर, शीतल प्रशांत खंडारे, वर्षा मनोहर मेश्राम, फरिदा परवीन ओ. अकील, दीपाली किरण वडुरकर यांना महिला व बालकल्याण विभागाद्वारे ५ हजार रुपये पुरस्कार, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह वितरीत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.