आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जनतेत स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतवणारे आझाद हिंद मंडळ

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबा गेटच्या आतील आझाद हिंद मंडळाचे हे श्री गणरायांच्या स्थापनेचे ९५ वे वर्ष असून, जनतेत स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतवणारे शहरातील हे नामांकित मंडळ होय. खेळ, समाजसेवा, दृश्य, देशातील प्रसिद्ध वास्तूंसह मंदिराचे भव्य देखावे साकारण्यात या मंडळाचा हातखंडा राहिला आहे. यंदा १२ ज्योर्तिंलिंगाचा देखावा येथे साकारण्यात आला असून, आजवर मोठे राजकीय नेते, कलावंतांनी या मंडळाला भेट दिली आहे.

स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या कल्पनेतून आजवर लाल किल्ला, ताजमहाल, अक्षरधाम मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, कन्याकुमारी, लासूर मंदिर, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, पंठरपूर विठ्ठल मंदिर, वारी देखावा यासह सामाजिक व आध्यात्मिक विषयांवर देखावे तसेच नाटक, मराठी हिंद कविसंमेलन, व्याख्याने आणि देशातील ज्वलंत विषयांवर नागरिकांचा वादविवाद असे प्रबोधनकारी कार्यक्रम मंडळाद्वारे सातत्याने आयोजित केले जात आहेत.

मंडळाची कार्यकारिणी : मंडळाचे अध्यक्ष एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सदस्य माजी महापौर विलास इंगोले, माजी खा. अनंत गुढे, माजी आ. प्रदीप वडनेरे, विवेक कलोती, राजाभाऊ मोरे, राजाभाऊ माजलगावकर, प्रकाश संगेकर, दिलीप कलोती, दिलीप दाभाडे, डाॅ. किशोर फुले, चंदू पवार, ज्ञानेश्वर हिवसे, नंदू गुंबळे. २०२२ चे अध्यक्ष डाॅ. संदीप दानखेडे, स्वागताध्यक्ष शैलेश अग्रवाल, उपाध्यक्ष नवीन चोरडिया, कैलास गिरोडकर, सचिव राजू पिंजरकर, कोषाध्यक्ष मनीष काजनेकर, सहसचिव निलेश वानखडे, अर्जुन इंगोले, राहुल कथलकर, वेदांत डांगे, अद्वैत बोराटने, संदोष बद्रे, संजय मुचळंबे, भुषण पुसतकर, रेवण पुसतकर, रोशन पुसतकर, योगेश पुंड व इतर.

परवशता पाश दैवे त्यांच्या गळा लागला… स्वातंत्र्यपूर्वकाळात अंबा गेटच्या आत शहर होते. वीर वामनराव जोशी, आबासाहेब बामणगावकर, अण्णासाहेब कलोती, अंबादासपंत वैद्य, राजाभाऊ बारलिंगे यांनी असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून जनजागृतीसाठी गणेश मंडळाची स्थापना केली. त्यावेळी मंडळाचे नाव राॅयल क्लब होते. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी कॅप्टन शाहनवाझ खान यांनी सूचवल्यानंतर मंडळाचे नाव आझाद हिंद मंडळ करण्यात आले. वीर वामनराव जोशी हे उत्तम नाटककार, कलावंत होेते. त्यांनी रणदुंदुभी, राक्षसी महत्त्वाकांक्षासह अनेक नाटकं बसवली. त्यापैकी रणदुंदुभी नाटाकातील पद परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला असून, खास मालक घरचा चोर म्हणती त्याला हे फारच गाजले. याचा सर्वसामान्यांवर चांगलाच परिणाम झाला. गणेशोत्सवासोबत वादविवाद, नाटिका, प्रभातफेऱ्या, इंग्रजांवर आसूड ओढणारे दृश्य देखावे या ठिकाणी तयार केले जायचे. ही परंपरा आजही कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...