आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:‘आजादी का अमृत महोत्सव’ विधी महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे १३ ते स्वातंत्र्यदिनापर्यंत ७५ वा आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख व कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश दाभाडे तथा विविध कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. प्रणय मालवीय, डॉ. राजेश पाटील यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांना आणि जनतेला घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले.

तत्पूर्वी महाविद्यालयाने १३ ऑगस्टची सुरुवात सकाळी ७.१५ वाजता ध्वजारोहनाने झाली. त्यानंतर वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, शौर्यचक्रधारक व वीर सैनिक यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती विभाग डॉ. केशव तुपे, अतिथी फ्लाइट लेफ्टनंट रत्नाकर चरडे व माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पठारे आदी मान्यवरांच्या हस्ते कांता सांगोले, सरस्वती मासोदकर, इंदूमती दंदी, स्नेहा ताटे, वंदना जावरकर, अश्विनी बाटे, रामभाऊ खराटे, संजय तायवाडे, ज्ञानेश्वर भुजाडे,नंदकिशोर झडके, प्रशांत भड, संजय बेलोरे आदींचा सत्कार शाल, श्रीफळ, वृक्षरोपटे, स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सपना विधळे तर आभार निता तिखिले यानी केले. ऋतुजा चव्हाण यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच १४ ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवाच्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा, देशभक्ती संदर्भात पोस्टर स्पर्धा, देशभक्तीवर नृत्य स्पर्धा, देशभक्तीपर नाटिका याचे आयोजन प्रा.डॉ. प्रणय मालवीय, प्रा.महेंद्र इंगोले, प्रा. डॉ. नंदकिशोर रामटेके, प्रा. डॉ. भाग्यश्री देशपांडे, प्रा. डॉ. चैतन्य घुगे, प्रा. सुरेश चापोळकर यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

बातम्या आणखी आहेत...