आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचा अयोध्या दौरा पार पडला. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली. संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना आपण शिंदे सरकारमध्ये नाराज नाही अशी स्पष्टोक्ती आमदार बच्चू कडूंनी दिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर चक्क सनी देओल अन् नाना पाटेकरशी तुलना करीत ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामामध्ये सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर!'' अशी तुलना केली.
...म्हणून विरोधकांची टीका
सीएम शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाऊन आले. या दौऱ्यात भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पण अनेक आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. संबंधित नेत्यांनी विविध कारणे देत अयोध्या दौरा टाळला. यावरून विरोधकांनी टीका केली होती.
काय म्हणाले होते संजय राऊत?
अयोध्या दौऱ्यात काही आमदार न गेल्याने संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत म्हणाले, सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे. काही आमदार त्यांच्या गटात नाराज आहे. संजय राऊतांच्या या विधानाला प्रहार संघटनेचे नेते आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे हे दबंग मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज व्हायचे काही कारण नाही. मी नाराज नाही. सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मी त्याच कामात व्यग्र होतो. त्यामुळे मी अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही.
ते सनी देओल अन् अॅक्शन नानांसारखी
बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामामध्ये सनी देओल आहेत. अॅक्शनमध्ये ते नाना पाटेकर यांच्यासारखे आहेत. त्यामुळे असे दबंग मुख्यमंत्री असताना आम्ही नाराज होण्याचं काहीच कारण नाही. याशिवाय बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. 7 ते 8 महिन्यांसाठी मंत्रीपद घेण्यात काहीही अर्थ नाही. शिंदे-फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला आहे. लोकांना पदापेक्षा काम करणे महत्त्वाच वाटते. आम्ही ते काम पूर्ण करतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.