आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू कडूंनीही माघार घेतली, आमचा वाद संपला:फडणवीसांच्या भेटीनंतर राणांचे वक्तव्य; पण अमरावतीतल्या घराला पोलिस संरक्षण

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्यासाठी शेतकरी, सामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते सोडवायचे आहेत. त्यामुळे बच्चू कडूंसोबतचा वाद आता राहिला नाही. माझ्याविरोधात उमेदवार उभे करू असे म्हणणाऱ्यांना सांगतो की, माझ्याविरोधात 50 उमेदवार उभे राहतात ते 60 जरी झाले तरीही मीच निवडून येतो, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी आज केले.

आमदार रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद राज्यभर गाजला. दोघांचा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सोडविला. आज आमदार बच्चू कडू यांनीही आपली भूमिका जाहीर करत वाद संपल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला.

मला फिकीर नाही

राणा म्हणाले, माझ्याविरोधात 50 उमेदवार उभे राहतात. लोकशाहीत ते साठ जरी झाले एकावन्न जरी झाले तरी लोकशाहीत लोकांना उभे राहण्याचा अधिकार आहे. लोकांच्या हिताचे, लोकांचे मी कामे करतो.

चारवेळा जेलमध्ये गेलो

राणा म्हणाले, शेतकरी आंदोलनासाठी मी चार- चार वेळा जेलमध्ये गेलो. लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आज जनता दरबार असो की, लोकांचे प्रश्न असो कुठल्याही पश्नाला लोकशाहीने लढण्याची ताकद लोकांनी मला दिली आहे. मागच्या वेळी मला वीस ते बावीस हजार मतांनी विजयी झालो. तीन टर्म मी याचपद्धतीने विजयी झालो.

विरोधकांची चिंता नाही

राणा म्हणाले, कोण माझ्याविरोधात उभे राहतो याची चिंता नाही मी लोकांसाठी लढतो, लोकांसाठी निवडणुकीत उभा राहतो. लोकांसाठी काम करतो आणि करीत राहणार. मी किराणा वाटून लोकांना, गरीबांना मदत करतो. विधवा महिला, सैनिकांच्या कुटुंबांना, माजी सैनिकांना मदत करतो. माजी सैनिकांच्या कुटुंबांच्या पालनपोषणासाठी मी माझा आमदारकीचा पगार देतो.

ते माझ्या रक्तातच

राणा म्हणाले, जे शिकू शकत नाही त्यांना मदत करायला हवी. सैनिकांसाठी मदत करणे आवश्यक आहे. मदत करणे माझ्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे मी मदत करतो. माझा इतिहास पाहीला तर रवि राणा लोकांच्या, गरीबांच्या मदतीला जाणारा आहे.

राणांच्या घराला संरक्षण

अमरावतीत रवी राणांच्या घराला पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. बच्चू कडू आणि त्यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर आता पोलिसांची चोख सुरक्षाही ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...