आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:बहुजन क्रांती मोर्चाने दिली 25 जूनला ‘भारत बंद’ची हाक; अॅड. सुनील डोंगरदिवे यांनी दिली पत्रकारपरिषदेत माहिती

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची एकता, अखंडता धोक्यामध्ये टाकण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. संघ आणि भाजप देशद्रोही शक्ती असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाने केला आहे. या विरोधात २५ जून रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असून, नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक अॅड. सुनील डोंगरदिवे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

बहुजन क्रांती मोर्चाच्या म्हणण्यानुसार, देशात ज्ञान व्यापीचा मुद्दा ‘भाजप आरएसएस’द्वारा उपस्थित करण्यात आला आहे. मथुरा, अयोध्या आदी मुद्यांवर राजकारण करण्यात येत आहे. भाजपच्या इशाऱ्यावर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विरोधात विधान केले. त्यामुळे देशाचे वातावरण बिघडले. हिंदू, मुस्लिम समाजातील नागरिकांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान भाजप सरकारचे आहे. या विरोधात २५ जून रोजी भारत बंद चे आवाहन करण्यात आले असल्याचे बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक अॅड. सुनील डोंगरदिवे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत विवेक कडू, प्रफुल्ल गवई,पंचशीला मोहोड, छत्रपती कटकतलवारे, अमित लांजेवार, सुषमा कांबळे, सचिन मोहोड आदी उपस्थित होते.