आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड:पैशाच्या वादावरुन युवकांनी केली बेकरीची तोडफोड; परतवाडा येथील घटना

परतवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सर्वत्र शांतता असताना काही असामाजिक तत्व सक्रिय होऊन शांतता भंग करण्‍याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही वर्षांपासून शहरातील काही चौकामध्ये दुचाकीवर केक ठेऊन ‘बर्थ डे‘ साजरा करण्याचा प्रकार मोठया प्रमाणात वाढला आहे. अशाच एका बर्थ डे केकवरुन मंगळवार, ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील नरसिंह मंदिरासमोरील बैंगलोर बेकरीत ५-६ युवकांनी दुकानात केकच्या पैशावरुन वाद घातला. त्यानंतर तोडफोड करुन तेथील कामगारांना मारहाण केली.

जयस्तंभ चौक ते बसस्थानक मार्गावरील नरसिंह मंदिरा नजीक काही महिन्यापूर्वी सुरेशचंद्र गौडा यांनी बैंगलोर बेकरी हे दुकान प्रारंभ केले. या दुकानातून केक व खाद्यपदार्थ विक्री केल्या जातात. गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे परिचित काही युवक नेहमी खाद्यपदार्थ घ्यायला येत असतं. २-३ वेळा त्यांनी केक नेला. मात्र पैसे दिले नाही. आज ५-६ युवक दुपारच्या सुमारास बेकरीमध्ये शिरले व हातात काठी तसेच घातक शस्त्र घेऊन तोडफोड करीत होते. यावेळी दुकानातील कामगार किशोर राजने व मनीष सुरपाटणे हे जखमी झाले. या युवकांनी केलेल्या हल्ल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आरोपीचा शोध प्रारंभ केला आहे. आरोपीचा शोध घेऊन रितसर कारवाई केल्या जाणार असल्याची माहिती संतोष ताले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...