आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक प्रमुखांना सूचना‎:जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांप्रती‎ संवेदनशील राहावे: आ. वानखडे‎

अंजनगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुर्जी‎ अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हा‎ अग्रणी बँक व समन्व कांची‎ आढावा बैठक जिल्हा धिकारी‎ कार्यालयात पार पडली. या वेळी‎ आमदार बळवंत वानखडे यांनी सर्व‎ बँक प्रमुखांची कान उघाडणी करीत‎ जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ् ाप्रती‎ संवेदनशील राहावे, अशा सूचना‎ दिल्या.‎ महाराष्ट्र बँकेमार्फत अंजनगाव‎ तालुक्यात कर्जवस लीसाठी‎ शेतकऱ्यांना थेट कोर्टाच्या नोटीस‎ पाठवल्या जात आहेत, तसेच‎ युनियन बँकेमार्फत शेतकऱ्यांचे‎ खाते गोठवले होते. त्यामुळे शेतकरी‎ शासनाच्या मिळणाऱ्या विविध‎ अनुदान ापासून वंचित होते.‎

याबाबत आमदारांनी हिवाळी‎ अधिवेशन दरम्यान सभागृहात मुदा‎ उपस्थित केला होता. त्यानंतरही‎ बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत‎ शेतकऱ्यांना कोर्टाच्या नोटीस‎ पाठवण्यात आल्या होत्या. त्याच‎ अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा‎ अग्रणी बँक व समन्वयक यांची‎ जिल्हाधिक ाऱ्यांकडे आ. वानखडे‎ यांनी तक्रार केली. तसेच बँकेमार्फत‎ सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांना‎ मिळणाऱ्या वागणुक ीबद्दल‎ सुधारणा करण्याबाबत सूचना‎ केली.

या पुढे शेतकऱ्यांना‎ बँकेमार्फत होणारा त्रास लक्षात घेता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बँकेचे स्थानिक ठिकाणचे परवाना‎ रद्द करण्यात येईल असा स्पष्ट‎ इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक‎ प्रमुखांना बैठकीत दिला. बैठकीला‎ जिल्हा धिकारी पवनी कौर व‎ जिल्ह्यातील सर्व बँकेचे प्रमुख‎ उपस्थित होते.‎ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना :‎ रब्बी हंगामातील कर्ज वाटपात‎ जिल्हा माघारीला असून‎ जिल्ह्यातील बँकाना कर्ज वाटपाचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ टार्गेट असताना सुद्धा कर्ज देण्यास‎ बँका टाळाटाळ करीत आहेत,‎ तसेच समाजकल्याण विभागामार्फत‎ दिव्यांग, अपंग व गोरगरीब‎ लाभार्थींना कर्ज मंजूर करण्यात येते,‎ परंतु या लाभार्थींचे सिबिल‎ स्कोअरचे कारण देऊन जिल्ह्यातील‎ बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत‎ आहेत. याबाबतची प्रलंबित प्रकरणे‎ तत्काळ निकाली लावून कर्ज वाटप‎ करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.‎जिल्हधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी,‎ आमदार व बँकांचे अधिकारी.‎

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल‎ ३ लाखांच्या वर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत‎ नोटीस पाठवण्यात आल्या. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या‎ नोटीस शेतकऱ्यांना न देण्याबाबत सूचित केले असून, १५ जानेवारीपर्यंत‎ अहवाल सादर करण्याचे सूचित केले, तसेच युनियन बँकेन शेतकऱ्यांच्या‎ गोठवलेल्या बचत खात्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली असल्याचे‎ आमदार बळवंत वानखडे यांनी सांगीतले.‎

बातम्या आणखी आहेत...