आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हा अग्रणी बँक व समन्वयकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी आमदार बळवंत वानखडे यांनी सर्व बँक प्रमुखांची कान उघडणी करीत जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्याप्रती संवेदनशील राहावे, अशा सूचना दिल्यात.
महाराष्ट्र बँकेमार्फत अंजनगाव तालुक्यात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना थेट कोर्टाच्या नोटीस पाठवल्या जात आहेत, तसेच युनियन बँकेमार्फत शेतकऱ्यांचे खाते गोठवले होते. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मिळणाऱ्या विविध अनुदानापासून वंचित होते. याबाबत आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुदा उपस्थित केला होता. त्यानंतरही बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत शेतकऱ्यांना कोर्टाच्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा अग्रणी बँक व समन्वयक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आ. वानखडे यांनी तक्रार केली. तसेच बँकेमार्फत सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सुधारणा करण्यबाबत सूचना केली.
या पुढे शेतकऱ्यांना बँकेमार्फत होणारा त्रास लक्षात घेता बँकेचे स्थानिक ठिकाणाचे परवाना रद्द करण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक प्रमुखांना बैठकीदारम्यान दिला. बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर व जिल्ह्यातील सर्व बँकेचे प्रमुख उपस्थित होते.
याबाबतही केल्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना
रब्बी हंगामातील कर्ज वाटपात जिल्हा माघारला असून जिल्ह्यातील बँकाना कर्ज वाटपाचे टार्गेट असताना सुद्धा कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत, तसेच समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग, अपंग व गोरगरीब लाभार्थ्याना कर्ज मंजूर करण्यात येते, परंतु या लाभार्थ्यांचे सिबिल स्कोअरचे कारण देवून जिल्ह्यातील बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबतची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली लावून कर्ज वाटप करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागीतला अहवाल
3 लाखांच्या वर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत नोटीस पाठवण्यात आल्या. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या नोटीस शेतकऱ्यांना न देण्याबाबत सूचित केले असून 15 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे सूचित केले, तसेच युनियन बँकेन शेतकऱ्यांच्या गोठविलेल्या बचत खात्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली असल्याचे आ. वानखडे यांनी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.