आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक सभा:सोशल मीडियाच्या मायाजाळात‎ गुंतलेल्या पाल्याविषयी सजग राहा‎

दर्यापूर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल ‎मीडियामध्ये पाल्य व पालक दोघेही ‎अडकले आहेत. परिणामी पाल्यांच्या ‎गुणवत्तेकडे पालकांचे दुर्लक्ष होत‎ आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना‎ यशस्वी करण्यासाठी, त्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी पाल्यांकडे नियमित‎ लक्ष ठेवून पालकांनी सजग रहावे‎ असे, आवाहन प्राचार्य डॉ. अतुल‎ बोडखे यांनी केले. श्री शिवाजी‎ शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक‎ जे. डी. पाटील सांगळुदकर‎ महाविद्यालयात नुकतीच पालक सभा‎ आयोजित केली होती. त्या प्रसंगी‎ सभाध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. बोडखे उपस्थित पालक‎ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना‎ बोलत होते.‎ या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून‎ पालक सभासद विनोद गायगोले‎ उपस्थित होते.

पालक सभेत‎ सर्वप्रथम नॅकचे समन्वयक प्रा.‎ मनीष होले यांनी होऊ घातलेल्या‎ नॅकविषयी पालकांना माहिती दिली.‎ त्यानंतर महाविद्यालयातील तिन्ही‎ शाखांच्या प्रमुखांनी आपापल्या‎ शाखेचा अहवाल वाचून दाखवला.‎ दरम्यान कला शाखा प्रमुख डॉ. नरेंद्र‎ माने, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.‎ मंगलावती पांडेय, विज्ञान शाखा‎ प्रमुख डॉ. विजय येलकर तसेच‎ राष्ट्रीय छात्र सेनेचे ले. कॅप्टन डॉ.‎ संतोष उके, राष्ट्रीय सेवा योजना‎ प्रमुख डॉ. राहुल सावरकर, ग्रंथालय‎ प्रमुख प्रा. सुरेंद्र काळे यांनी आपल्या‎ विभागांच्या अहवालांचे सविस्तर‎ वाचन केले. त्यानंतर विनोद‎ गायगोले यांनी महाविद्यालयाच्या‎ प्रगतीचा आलेख मांडला. शेवटी‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष व‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल‎ बोडखे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी‎ महाविद्यालयाचे नाव दूरदूरपर्यंत‎ पोहोचवले त्या कर्तृत्ववान‎ विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या पालक‎ सभेला गावातील व बाहेर गावातील‎ विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते. काही पालकांनी‎ महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या‎ विविध उपक्रमांबाबत समाधान‎ व्यक्त केले, तर काहींनी सूचना‎ केल्यात. या पालक सभेसाठी‎ महाविद्यालयातील सर्वच‎ प्राध्यापकवृंदांनी परिश्रम घेतले.‎ पालक सभेचे सूत्रसंचालन प्रा.‎ वैशाली चौरपगार यांनी केले.‎ आभार संगीत विभाग प्रमुख डॉ.‎ सुरेंद्र शेजे यांनी मानले. सभेला सर्व‎ प्राध्यापक, कर्मचारी, तसेच विद्यार्थी‎ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...