आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दाद मागणाऱ्या शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीकडून मारहाण

वर्धा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत चणा विक्रीसाठी आणला होता. चन्याचा कोटा पूर्ण झाल्याने दारोडा येथील शेतकऱ्याचा चणा खरेदी करण्यात आला नसल्याने संतप्त शेतकऱ्याने दाद मागण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचा शेतकऱ्यांमधून निषेध केला जात आहे.

नाफेड अंतर्गत चणा खरेदी सुरू असल्याने चणा विकण्यासाठी हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील शेतकरी सुभाष रेवतकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. नाफेड अंतर्गत चणा खरेदी करण्याचा कोटा शनिवार रोजी पूर्ण झाला असल्याने चणा खरेदी करण्यात येणार असल्याचे शेतकरी रेवतकर यांना सांगण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने विकण्यासाठी आणलेला चणा हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवून घ्यावा, अशी विनवणी रेवतकर यांच्याकडून करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी दाद मागण्यासाठी बाजार समितीचे सभापतींकडे धाव घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या दालनात शेतकरी गेले असता कोठारी व शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्या वादातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी समितीच्या आवारात शेतकरी रेवतकर यांना चक्क मारहाण केली. या विषयावर उद्या बोलू ः बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याला मारहाण झाली. या बाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, या विषयावर उद्या बोलू, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी सांगितले आहे

मोबाइलवर मेसेज आल्यावरही चणा खरेदी केली नाही
तीन दिवसांपासून हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चणा विक्रीकरिता घेऊन आलो होतो.कोटा पूर्ण झाला असल्याचे सांगितले आणि चणा खरेदी करिता नकार दिला. सभापतींंना विचारणा केली असता, त्यांनी मारहाण केली व मोबाईल हिसकावून घेतला. सुभाष रेवतकर, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...