आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकेने केली मारहाण:अपमान सहन न झाल्याने आठवीतील मुलाने घरातच घेतला गळफास, अमरावतीतील घटना

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तखतमल इंग्लिश हायस्कूलमध्ये आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेने शाळेतील इतर मुलांसमोर मारहाण केली. त्यामुळे इतर मुले हसली. हा अपमान सहन न झाल्याने १३ वर्षीय चैतन्य दिवाकर सिसोदे (रा.खंडेलवालनगर) याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी मुख्याध्यापिकेविरुद्ध ९ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला आहे.

८ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चैतन्य घरी अभ्यास करत होता. त्या वेळी त्याची आई खरेदीसाठी बाहेर गेली होती.यादरम्यान चैतन्यने सीलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. दरम्यान, हा अपमान सहन न झाल्यामुळेच ‘माझ्या मुलाने आत्महत्या केली, असे मुलाच्या आईने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अल्पवयीन मुलास आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खेळण्यातील क्युबरवर चिठ्ठी चिकटवली

चैतन्यने ज्या ठिकाणी गळफास घेतला होता, त्याच्या बाजूने खेळण्याच्या पिवळ्या रंगाच्या क्यूबवर एक चिठ्ठी सेलो टेपने चिकटवून ठेवली होती. त्या चिठ्ठीत चैतन्यने इंग्रजीत स्वहस्ताक्षरात लिहिले होते की, मी शाळेतच माझ्या एका मित्राला भेटायला गेलो असता मुख्याध्यापिकेने त्याच ठिकाणी मला मारहाण केली. तसेच वर्गाबाहेर काढून शिक्षा दिली. सर्व विद्यार्थी हे पाहत होते. ते मला हसले.’

बातम्या आणखी आहेत...