आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साली झाली घरवाली:एका मुलीला सोडून दुसरीच्या मागे लागल्याने सासूकडून मारहाण; जावयाकडून तक्रार दाखल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीचे एका तरुणीसोबत लग्न झाले.मात्र ती पतीकडे दोनच वर्ष राहीली यानंतर तिच्या बहिणीचे आणि नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर सासूला ही माहिती दिली. राग अनावर झालेल्या सासूने जावयाला डोक्यात विट घालून जखमी केले आहे, या प्रकरणी जावयाकडून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

बायकोचे आणि साली (मेव्हणी) त्याच्या घरी राहायला आली. या प्रकारामुळे सासू जावायाकडे आली तिने जावयाकडे असलेल्या मुलीला घरी चल म्हटले, मात्र ती मुलगी त्यावेळी गेली नाही. तुमच्यामुळेच माझी मुलगी येत नाही, असे म्हणून वाद घालून सासूने जावयाच्या डोक्यात विट मारुन जखमी केले. हा धक्कादायक प्रकार 3 सप्टेंबरला घडला आहे. या प्रकरणी जखमी जावयाने पोलिसात तक्रार दिली आहे.

ग्रामिण पोलिसांच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाचा काही वर्षांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे एका युवतीशी विवाह झाला. विवाहानंतर त्याची पत्नी दोन वर्ष त्याच्याकडे राहीली, नंतर मात्र ती पतीच्या घरुन निघून गेली. त्यानंतर या युवकाची साळी त्याच्या घरी आली व ती रहायला आली. दरम्यान जावयाकडे साळी राहत असल्यामुळे सासू जावयाकडे आली आणि तीने जावयाला म्हटले कि, जावई तुम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरात कसे काय ठेवले, तीला आम्ही घ्यायला आलो आहोत, तुम्ही तीला आमच्या सोबत पाठवा. त्यावर जावयाने सासूला म्हटले कि, ती तुमचीच मुलगी आहे, तुम्ही घेवून जा. त्यावेळी मुलीने तीच्या आईला म्हटले कि, मी सद्या येत नाही, दोन ते तीन दिवसांनी येईल. या कारणावरुन सासू व साळीमध्ये त्याचठिकाणी वादविवाद सुरू झाला.

यावेळी जावई या दोघी मायलेकींच्या मधात गेला व मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने सासू व साळीला समजावले. त्यावेळी सासू जावयाला म्हणाली कि, माझी मुलगी तुमच्यामुळेच आमच्यासोबत यायला तयार नाही. त्याचवेळी जावयाच्या घरातील अंगणात पडलेल्या विटांचा तुकडा उचलून सासूने हातात घेतला आणि थेट जावयाच्या डोक्यात मारला. त्यामुळे जखम होवून त्याच्या कपाळातून रक्त यायला लागले. तसेच सासूसोबत असलेल्या दोन व्यक्तींनी थापडा बुक्क्यांनी जावयाला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जावयाने दिलेल्या तक्रारीवरुन ग्रामिण पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुध्द मारहाण करणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...