आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Beautiful Demonstrations On Mallakhamba Day In 'HVPM'; Celebration Of World Mallakhamba Day At Shri Hanuman Vyayam Prasarak Mandal |marathi News

दिव्य मराठी विशेष:‘एचव्हीपीएम’मध्ये मल्लखांब दिनी देखणी प्रात्यक्षिके; श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जागतिक मल्लखांब दिवस साजरा

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मल्लखांब हा अस्सल मराठमोळा व्यायाम व क्रीडा प्रकार आज केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादीत न राहता देशाच्या सीमारेषा ओलांडून अनेक परदेशामध्ये जाऊन पोहोचला आहे. त्यामुळेच १५ जून ‘आतंरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे जागतिक मल्लखांब दिनी खेळाडूंनी नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात आयोजित सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा उपसंचालक विजय संतान, मंडळाच्या सचिवडॉ. माधुरी चेंडके, विदर्भ केसरी डॉ. संजय तीरथकर, प्रा. संतोष इंगोले, डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, डॉ. सूर्यकांत पाटील,प्रा.आशिष हाटेकर, प्रा. विलास दलाल उपस्थित हेाते.

कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे ‘मल्लखांब’ खेळाचे वर्णन केले जाते. मल्लखांब हा अस्सल मराठमोळा व्यायाम व क्रीडा प्रकार आहे. मल्लखांब हा खेळ मुले व पुरुषांसाठी लाकडी खांबावर तसेच मुली व महिलांसाठी दाेरीवर खेळला जातो. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने स्थापनेपासून तर आजवर मल्लखांब प्रचार-प्रसारासोबतच खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे.

मल्लखांबाचे शारीरिक फायदे
मल्लखांबाला तेल लावले असल्याने शरीराचे सतत घर्षण लाकडी खांबाला होते. परिणामी उत्तम प्रकारे मल्लखांबपटूच्या शरीराला तेलाने मालीश होते. यकृत, प्लिहा, आंतर इंद्रिय कार्यक्षम राहातात. उलट-सुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण या शरीरातील क्रियांचा वेग वाढून त्या अधिक कार्यक्षम बनतात तसेच अतिरिक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद, कमी होते. आपल्या हातापायाचे पंजे, मांडया, पोटऱ्या, दंड, खांदे व स्नायू क्षमता वान व लवचिक बनतात. तसेच पोटाचे स्नायू, बरगडया, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते. मल्लखांबामुळे फक्त शारीरीक विकासच नव्हें तर मानसिक स्वास्थ्यही मिळते.

बातम्या आणखी आहेत...