आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकता प्रशिक्षण:यशस्वी उद्योजक होऊन सामाजिक क्रांती घडवा ; प्रदीप इंगळे यांचे प्रतिपादन

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात काही ठराविक लोक दिसून येतात. अनुसूचित जातीच्या लोकांनीही उद्योजक होऊन सामाजिक क्रांती घडवून आणावी. याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण देऊन उद्योजक घडवण्याचे कार्य महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास (एम.सी.इ.डी.) चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले. उद्योग संचालनाय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन शुक्रवार (ता.१९) रोजी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, बडनेरा पार पडला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक नंदकिशोर इंगळे यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय वानखडे, कृषी विज्ञान केंद्राचे निरीक्षक राहुल घोगरे, एम. सी.ई. डी. चे प्रकल्प अधिकारी राजेश सुने, कार्यक्रम अधिकारी गजेश बहाड, नेत्रदीप चौधरी, बार्टीच्या समतादूत अनिता राऊत आदी उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराचे संचालन गजेश बहाड यांनी तर आभार राजेश सुने यांनी मानले.

विविध योजनांचा लाभ घ्या : नंदकुमार इंगळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेले उत्तम उद्योजक घडवले आहे. योजनेच्या माध्यमातून अनेकांना स्वयंरोजगार मिळालेला आहे. विविध योजना आहेत. त्या योजनेचा लाभ प्रशिक्षणार्थींना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक नंदकुमार इंगळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...