आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Beginning Of Grain Distribution With Rice For The Month Of June For Students At School Level; Nutritious Diet From The First Days Of School |marathi News

दिव्य मराठी विशेष:शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी जून महिन्याच्या तांदळासह धान्य वितरणाला सुरुवात; शाळेच्या पहिल्या दिवसांपासून पौष्टिक आहार

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत असून, आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शिजवलेली खिचडी दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून नियोजन केले आहे. जून महिन्याच्या तांदळासह धान्याची मालाच्या वितरणाला सुरुवात झाली असून, त्याचा शाळास्तरावर पुरवठा केला जात आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या.

मध्यान्ह भोजन योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९ मध्ये सुरू इाली. कोरोनापूर्वी शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान्ह भोजन राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना पौष्टिक खिचडी शिजवून देण्यात येत होती. मात्र, कोरोना कालावधीत शाळाच बंद असल्याने खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना दर महिन्याचा तांदूळ आणि कडधान्य असा कोरडा शिधा देण्याचा निर्णय झाला होता.

यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिने युक्त आहार तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार मिळावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आहार तयार करण्यात येतो. मात्र, जेथे विलंबाने पुरवठा झाला त्या शाळांना शिल्लक तांदूळ व धान्याची वाटप नियमानुसार करण्याचे निर्देश आहे. जिल्ह्यात २ हजार ३८९ लाभार्थी शाळा असून यामध्ये २ लाख ४२ हजार ७७६ विद्यार्थी लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यात इयत्ता पहिली ते पाचवी १ लाख ४० हजार ४३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय इयत्ता सहावी ते आठवीचे १ लाख २ हजार ३३९ विद्यार्थी लाभास पात्र आहेत

बातम्या आणखी आहेत...