आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:बेलोरा ; टर्मिनल इमारतीच्या बांधकाम निविदा काढण्याचे खा. राणांचे निर्देश

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलोरा विमानतळावरून अजूनही किमान दीड वर्ष विमानोड्डाण शक्य नसल्याचे वृत्त दिव्य मराठीने नुकतेच दिले. याची दाखल घेत बुधवार २३ रोजी खा. नवनीत रवी राणा यांनी बेलोरा विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच टर्मिनलसाठी केंद्राकडून ७५ कोटी रु.चा निधी आला असून त्यापैकी ५२ कोटी रु. मंजूर झाल्यामुळे टर्मिनल इमारत व धावपट्टीचे काम पूर्ण करता येईल. दोन दिवसांत टर्मिनल इमारतीसाठी निविदा उघडण्यात यावी, असे निर्देश बेलोरा विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

जून २०२३ पर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर येथून ९० आसनी विमान उड्डाण घेईल. यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. खा. राणा यांनी बेलोरा विमानतळाचे कार्यकारी अभियंता राम कुर्जेकर आणि व्यवस्थापक गौरव उपश्याम यांच्याशी चर्चा केली. सोबतच त्यांनी विमानतळाच्या धावपट्टीसह विस्तार आराखड्याचीही माहिती घेतली.यावेळी खासदार कार्यालयाचे सचिव उमेश ढोणे, युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल, मंगेश चव्हाण, अमोल मिलके, सुधा तिवारी, प्रीती देशपांडे, सोनू रुंगटा, पंकज शर्मा, खुशाल गोंडाणे, संजय मुंडेत, विलास वाडेकर व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...