आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थी घरकुल:प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी घरकुलाच्या प्रतिक्षेत ; सदनिकांचा ताबा कधी मिळणार

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे बांधकाम सुरू असले तरी अद्याप अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळाले नाही. त्यामुळे महानगर पालिकेद्वारे केव्हा आपल्याला सदनिकांचे वाटप होते, याचीच ते प्रतीक्षा करीत आहेत. सातत्याने लाभार्थी आम्हाला सदनिकांचा ताबा कधी मिळणार, अशी विचारणा मनपाच्या बांधकाम विभागात येऊन करीत आहेत. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर मिळेनासे झाले आहे. अपूर्ण राहिलेली तांत्रिक कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...