आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव खंडेश्वर:घरकुलाच्या जागेसाठी शिवणी रसुलापूर येथील लाभार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू

नांदगाव खंडेश्वर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिवनी रासुलापूर येथे अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या अद्यापही सोडण्यात आल्या नसल्याने घरकुल लाभार्थ्यांसह जे नागरिक बेघर आहेत त्यांनी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्या अनुषंगाने त्यांनी सोमवारपासून (दि. ४) शिवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयापुढे आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपोषणाला बसलेल्यांमध्ये विनोद गोंडाणे, बाबाराव इंगळे, राधाबाई सळसळे, रंजना मेश्राम, सुनीता शेंडे, शेवंता गोंडाणे, रुखमाबाई उके, बेबी केवट, मीरा भोयर, वर्षा खंगार, लिला उपरीकर, शरद बनकर, पंचाबाई शिंदे, पंडितराव बुरे, गोविंदा गोंडाणे, महादेव शेंडे, आकाराम मेश्राम, फकिरा खडसे, लिला भोयर, वसंता मेश्राम, यशोदा मेश्राम, रोशन खडसे, सुनीता भोयर, चंद्रकला सोनवणे, नंदा शेंडे, तुळसा गौरखेडे, नानीबाई आगरे, विजय शेंडे, राधा भोयर, राजू मेश्राम, दिवाकर अंगार यांचा सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...