आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन‎:"श्रीं''च्या प्रगट दिनानिमित्त वलगाव‎ येथे आजपासून भागवत सप्ताह‎

वलगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या पर्वावर‎ वलगाव येथे ६ ते १३ फेब्रुवारी दरम्यान श्रीमद‎ भागवत सप्ताहाचे आयोजन केले. कुऱ्हा येथील‎ श्री देवाशिष महाराज हे भागवत कथा व प्रवचन‎ करणार आहेत. दररोज दुपारी २.३० ते सायंकाळी‎ ६ वाजेपर्यंत भागवत कथा होणार आहे.‎ श्री गजानन महाराज मंदिर, चांदूर बाजार रोड,‎ जिल्हा परिषद शाळेच्या मागे, वलगाव येथे‎ सप्ताह होणार आहे. ६ फेब्रुवारीपासून दररोज‎ सकाळी ६ वाजता श्रींचा अभिषेक, आरती‎ तसेच दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत‎ श्रीमद भागवत कथा व प्रवचन, सायं. ७ वाजता‎आरती, रात्री ८ ते १० दरम्यान‎भजन होणार आहे.

तसेच १२‎फेब्रुवारीला सकाळी ७ ते १‎या वेळात श्री गजानन विजय‎ग्रंथाचे सामूहिक पारायण.‎रात्री ९ ते १२ या वेळात‎ ‘जागरण’ होणार आहे. सायंकाळी ६ वाजता‎ शोभायात्रा निघणार आहे. तसेच १३ फेब्रुवारीला‎ सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन, दुपारी १२ ते‎ ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.‎ सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन श्री गजानन महाराज सत्संग समिती,‎ पटोकारपुरा, वलगाव यांच्याकडून करण्यात‎ आले.‎

बातम्या आणखी आहेत...