आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:भंडारा, गोंदिया जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवर कुरघोडी!

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा, गोंदिया जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवर कुरघोडी!

| भंडाराभंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी एकमेकांना मदत करण्याऐवजी विरोधातील भाजपच्या मदतीने सत्तेत भागीदारी मिळवली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा जि. प. त काँग्रेसने भाजपच्या नाराज गटाच्या मदतीने अध्यक्ष पद मिळवले. तर गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना दे धक्का करत भाजपच्या मदतीने सत्तेत वाटा मिळवला. गोंदियात अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही काँग्रेसवर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली.भंडारा जि. प.च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी अत्यंत तणावाच्या वातावरणात झाली. यात काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. विजयी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना २७, तर विरोधकांना २५ मते मिळाली. दरम्यान, सभागृहात भाजपचे दोन्ही गट एकमेकांवर भिडले. यात काँग्रेसचे काही सदस्य चालून आल्याने सभागृहातच हाणामारी झाली. यात भाजपच्या एका महिला सदस्याचे मंगळसूत्र तुटले, तर तीन सदस्यांचे शर्ट फाटल्याने या निवडणुकीला गालबोट लागले.

काँग्रेसकडून गंगाधर जिभकाटे हे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या वाघमारे गटाचे संदीप टाले विजयी झाले. अध्यक्षपदासाठीचे राष्ट्रवादीचे अविनाश ब्राह्मणकर यांना २५, तर काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांना २७ मते मिळाली. तर, उपाध्यक्षपदाचे भाजपचे प्रियांक बोरकर यांना २५, तर भाजपचे वाघमारे गटाचे संदीप टाले यांना २७ मते मिळाली. एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात भंडारा जिल्ह्यात नव्या युतीचे समीकरण पुढे आले. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपचे आ. परिणय फुके यांचा एक गट, शिवसेना, बसपा आणि दोन अपक्ष असे २५ सदस्य एकत्र आले. त्यांनी काँग्रेस आणि भाजपसह अन्य सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी झाले नाही.भंडारा जि. प. त सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे २१ सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या पं. स. सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे काँग्रेस दुखावला होता. तर, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे हे सुद्धा पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्यामुळे त्रस्त होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेचे नवीन समीकरण करत भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना हाताशी घेतले. वाघमारेंकडे पाच आणि एक अपक्ष असे सहा सदस्य होते. ही युती करताना काँग्रेसचे २१, वाघमारे गटाचे ५ आणि एक अपक्ष असे २७ जण एकत्र येत काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापन केली.

बातम्या आणखी आहेत...