आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र नारेबाजी:खासदार राणांच्या विरोधात निघाला भीम आर्मीचा मोर्चा ; ​​​​​​​राजापेठ पोलिसांत दाखल केली तक्रार

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भीम आर्मी एकता मिशनच्या नेतृत्वात सोमवारी (दि. १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( इर्विन) चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. खासदार राणा यांनी पोलीस प्रशासनाच्या कामात व्यत्यय आणल्याचा तसेच मागासवर्गीय संवर्गाबाबत वापरलेल्या एका शब्दामुळे तीव्र नारेबाजी केली. याचवेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा खासदार राणा यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला.

भीम आर्मीच्या म्हणण्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी आठ दिवसांपुर्वी राजापेठ पोलीस ठाण्यात जावून पोलिसांवर कॉल रेकॉर्डिंगचा आरोप केला होता. यावेळी पोलिस व खासदार राणा आमने - सामने आले होते. यावेळी उपस्थित पोलिसांसोबत अरेरावी केली, तसेच शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका तरुणीची बदनामी केल्याचाही भीम आर्मीचा आरोप आहे. खासदार राणा यांनी मूलभूत हक्काचे हनन केले असून कायदेशीर कारवाई करावी. तसेच खासदार राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर न्यायालयीन निर्णय होणार नाही, तोपर्यंत राणा यांनी दाखल केलेले अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हे रद्द करण्यात यावे, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, याच मागण्यांसाठी जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, अंकुश कोचे, अक्षय पांडे, आकाश इंगळे, प्रदीप उसरे, अखिलेश यशपाल, किशेज पठाण, सिध्दांत वानखडे, राणी इराणी, अनवर शेख, इम्रान इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याच मागणीसाठी भीम आर्मी संघटनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. तसेच राजापेठ पोलीस ठाण्यात खासदारांविरुद्ध तक्रार दाखल केली.

विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणार
खासदार राणा यांच्याविरुध्द सिताराम गंगावणे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी नेमक्या कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, हे सुध्दा नमुद केले आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर प्रकरणात विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहोत.
- मनीष ठाकरे, राजापेठ ठाणेदार.

बातम्या आणखी आहेत...